बातम्या
शिवरात्रीचे महत्व
By nisha patil - 8/3/2024 7:37:23 AM
Share This News:
प्रकाश म्हणजे तुमच्या मनात घडणारी एक क्षणिक घटना आहे. प्रकाश हा शाश्वत नसतो, तो नेहमीच मर्यादित असतो कारण तो उदयाला येतो आणि संपतो. या
ग्रहावर आपल्याला माहित असलेला प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य आहे. अगदी सूर्याचा प्रकाशसुद्धा, तुम्ही तुमच्या हाताने थांबवू शकता आणि काळी सावली पाडू शकता. पण काळोख सर्वत्र पसरलेला आहे. जगातील अपरिपक्व मने नेहमीच अंधाराचे वर्णन सैतान म्हणून करतात. परंतु जेव्हा तुम्ही परमात्म्याचे सर्वव्यापी म्हणून वर्णन करता, तेव्हा तुम्ही स्पष्टपणे परमात्म्याचा उल्लेख काळोख म्हणून करत आहात, कारण फक्त काळोखच सर्वव्यापी आहे. तो सर्वत्र आहे. त्याला कशाच्याही आधाराची गरज नाही.
प्रकाश नेहमीच स्वतः जळत असलेल्या स्रोताकडून येतो. त्याला सुरुवात आणि शेवट आहे आणि तो नेहमीच मर्यादित स्रोताकडून येतो. अंधाराचा स्रोत नाही. तो स्वतःचा स्रोत आहे. तो सर्वव्यापी, सर्वत्र आहे. म्हणून जेव्हा आपण शिव म्हणतो, तेव्हा आपण अस्तित्वाच्या विशाल शून्यतेबद्दल बोलत आहोत. या विशाल शून्यतेच्या मांडीवरच सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. आणि यालाच आपण शिव म्हणतो.शिवरात्रीचे महत्व
भारतीय संस्कृतीमध्ये, कुठल्याही प्राचीन प्रार्थना स्वतःचे संरक्षण करण्याबद्दल किंवा जीवन चांगले घडवण्याबद्दल नव्हत्या. सर्व प्राचीन प्रार्थना नेहमीच "हे प्रभू, मला नष्ट कर म्हणजे मी तुझ्यासारखा होऊ शकेन" अशा होत्या. म्हणून शिवरात्री, जी महिन्यातली सर्वात काळोखी रात्र आहे, ती प्रत्येक मानवासाठी, त्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याची, सृष्टीच्या उगमाची अमर्यादता अनुभवण्याची संधी आहे, जी प्रत्येक मानवामध्ये बीजरूपात उपस्थित असते.प्रकाश म्हणजे तुमच्या मनात घडणारी एक क्षणिक घटना आहे. प्रकाश हा शाश्वत नसतो, तो नेहमीच मर्यादित असतो कारण तो उदयाला येतो आणि संपतो. या
ग्रहावर आपल्याला माहित असलेला प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य आहे. अगदी सूर्याचा प्रकाशसुद्धा, तुम्ही तुमच्या हाताने थांबवू शकता आणि काळी सावली पाडू शकता. पण काळोख सर्वत्र पसरलेला आहे. जगातील अपरिपक्व मने नेहमीच अंधाराचे वर्णन सैतान म्हणून करतात. परंतु जेव्हा तुम्ही परमात्म्याचे सर्वव्यापी म्हणून वर्णन करता, तेव्हा तुम्ही स्पष्टपणे परमात्म्याचा उल्लेख काळोख म्हणून करत आहात, कारण फक्त काळोखच सर्वव्यापी आहे. तो सर्वत्र आहे. त्याला कशाच्याही आधाराची गरज नाही.
प्रकाश नेहमीच स्वतः जळत असलेल्या स्रोताकडून येतो. त्याला सुरुवात आणि शेवट आहे आणि तो नेहमीच मर्यादित स्रोताकडून येतो. अंधाराचा स्रोत नाही. तो स्वतःचा स्रोत आहे. तो सर्वव्यापी, सर्वत्र आहे. म्हणून जेव्हा आपण शिव म्हणतो, तेव्हा आपण अस्तित्वाच्या विशाल शून्यतेबद्दल बोलत आहोत. या विशाल शून्यतेच्या मांडीवरच सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. आणि यालाच आपण शिव म्हणतो.
शिवरात्रीचे महत्व
|