बातम्या

संतुलित जीवनाचे महत्व

Importance of balanced life


By nisha patil - 7/23/2023 7:36:49 AM
Share This News:



मित्रांनो आपल्याला जर नेहमी आपले शरीर आणि मन निरोगी ठेवायचे असेल आणि आरोग्यदायी जीवण जगायचे असेल तर आपण आपल्या शरीराला योग्य तो पौष्टिक आहार देणे खुप महत्वाचे असते.

कुठल्याही एकाच जीवणसत्वाचा आहारात समावेश न करता विविध जीवणसत्वांचा आहारात समावेश करणे आणि व्यायाम करणे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी फार गरजेचे असते.

कारण आपल्या शारीरीक वाढीसाठी आपल्याला Minerals,Protein,Calcium,Vitamin,इत्यादीने युक्त अशा सर्व शरीराला आवश्यक पौष्टिक आहाराचे सेवण करणे म्हणजेच संतुलित आहार घेणे फार गरजेचे असते.


एकदम तसेच आपल्या आयुष्याचे देखील आहे आपल्याला जर आयुष्यात खुप सुखी,आनंदी, समाधानी आणि धनसंपन्न राहायचे असेल तर आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक बाबतीत एक Balance ठेवणे फार गरजेचे आहे.


कारण जीवणात यशस्वी झालेल्या खुप जणांची अशी तक्रार असते की मी आयुष्यात पैसा नाव तर खुप कमविले पण स्वतासाठी आणि स्वताच्या कुटुंबासाठी अजिबात पुरेसा वेळच देऊ शकलो नाही.

स्वताच्या आनंदासाठी वेळच देऊ शकलो नाही,पाहिजे तेवढी Enjoyment Life मध्ये करू शकलो नाही.स्वताच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊ शकलो नाही.

किंवा मी आयुष्यात नातेसंबंध माणुसकी तर खुप जपली पण पाहिजे तेवढे धन आणि यश मी कमावू तसेच प्राप्त करू शकलो नाही कारण तेवढा वेळच माझ्याकडे उपलब्ध नव्हता.


अशा अनेक तक्रार आपल्या प्रत्येकाच्या असतात म्हणजेच आयुष्यात कुठे ना कुठे आपण कमी पडत असतोच.

ज्याच्याकडे खुप नाव,पैसा प्रसिदधी आहे त्याच्याकडे सुख आनंद आणि समाधान नाहीये,चांगले आरोग्य तसेच शांत झोप देखील नसते.कारण दिवसरात्र तो यश आणि पैसा कमविण्यासाठी सदैव धावतच असतो.

याला कारण आपण आयुष्यात कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचे?किती वेळ द्यायचा याचे एक संतुलन राखलेले नसते.आपण एका गोष्टीकडे लक्ष देण्यात इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असतो.आणि मग पुढे जाऊन आपल्याला Regret करण्याची वेळ येत असते.
 


संतुलित जीवनाचे महत्व