बातम्या

देशाच्या विकासात चार्टर्ड अकाउंटंट चे महत्त्वाचे योगदान - सी .ए .महेश पोतदार

Important contribution of Chartered Accountant in the development of the


By nisha patil - 8/13/2023 12:40:59 AM
Share This News:



देशाच्या विकासात चार्टर्ड अकाउंटंट चे महत्त्वाचे योगदान - सी .ए .महेश पोतदार

इचलकरंजी चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या दिशेने प्रवास सुरू करण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांना नवउर्जा व पाठबळ मिळण्यासाठी श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये सीए फाउंडेशन परीक्षेत उत्तम यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी येथील वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे व नामांकित चार्टर्ड अकाउंटंट श्री महेश पोतदार साहेब व त्यांच्या सौभाग्यवती आशा पोतदार उपस्थित होत्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) द्वारे जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फौंडेशन परीक्षेत उज्वल व नेत्रदीपक या संपादन केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते यावेळी सीए महेश पोतदार यांनी विद्यार्थ्यांची मनमोकळ्या गप्पा मारल्या सीए फाउंडेशन ची तयारी कशी करावी तयारी करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या त्या कशा सोडवाव्यात अभ्यासाचे नियोजन कसे करावे असे अनेक बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले श्रद्धा इन्स्टिट्यूट ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी असते आणि एक विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे कार्य या संस्थेने केलेले आहे या इन्स्टिट्यूटची स्तुती करावी तेवढी कमीच आहे भविष्यात या क्षेत्राकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल राहावा यासाठी तांबे सरांनी इचलकरंजी येथे अकाउंटन्सी म्युझियम बनवावे अशा भावना यावेळी त्यांनी बोलून दाखविल्या सदर भावनेला प्रतिसाद दे संस्थेचे अध्यक्ष श्री ए. आर. तांबे सरांनी काही दिवसातच अकाउंटन्सी म्युझियम उभी असेल आणि त्याची कारवाई आत्तापासून सुरू होईल अशी ग्वाही सीए महेश पोतदार यांना दिली श्रद्धा जुनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सचे तब्बल 27 विद्यार्थी सीएफ फाउंडेशन परीक्षेत नेत्र दीपक यश संपादन करीत इंटरमीडिएट साठी पात्र ठरले आहेत ही खूप मोठी बाब आहे असे प्रतिपादन सीएम महेश पोद्दार यांनी केले चार्टर्ड अकाउंटंट बनण्याची प्रक्रिया लांबलचक आहे आणि परिणामी विद्यार्थ्यांचे लक्ष यामुळे विचलित होऊ शकते परंतु सात त्यात मेहनत जिद्द चिकाटी या गोष्टी विद्यार्थ्यांकडे असतील तर त्यांना शंभर टक्के यश मिळेल असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष श्री ए. आर. तांबे सरांनी काढले

उत्तुंग यश संपादन करणारे विद्यार्थी अनुक्रमे भूमिका मुदंडा (322) ,संमती पाटील (316) ,प्रांजल अग्रवाल (315), हर्षल लढा (296), नयन राठी (287) ,देवांशी बालदी (285), आदिती कबाडे (268), तनिषा जैन (261) ,प्रज्ञा राघू (253), अस्मि कौलकर (245) ,अमेय कदम (244), रुतिका पाटील (242), सिद्धी बालदी (239), राजेश्वरी मगदूम( 237), भूमिका भन्साळी (236) ,सिद्धी कुलकर्णी (236), कनक दाहीमा (231) ,सृष्टी नाईक नवरे (223), दिया पाटील (222), नागेश चौधरी (222), अंजली तनवाणी (210) ,आदित्य मनवाडी (210), मनीषा सकांण्णा (209) ,ओमकार भोईटे (208), धीरज कुलकर्णी (207) ,हर्षदा बडे (206), या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री ए .आर .तांबे सर संस्थेचे समन्वयक श्री एम. एस. पाटील सर, सुप्रिया कौंदाडे मॅडम, सौ. संगीता पवार मॅडम, श्री अक्षय सर ,श्री अभिषेक सर, सौ सृष्टी मॅडम, कॉमर्स विभागाच्या समन्वयिका सौ कानेटकर मॅडम या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले


देशाच्या विकासात चार्टर्ड अकाउंटंट चे महत्त्वाचे योगदान - सी .ए .महेश पोतदार