बातम्या

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश ; राजकीय पक्षांना बसून सर्वाधिक झटका

Important orders of the Supreme Court Political parties have been hit the hardest


By nisha patil - 11/3/2024 7:24:15 PM
Share This News:



सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश ; राजकीय पक्षांना बसून सर्वाधिक झटका

नवी दिल्ली: राजकीय पक्षांना स्वार्थ साधण्यासाठी बेमालूमपणे सुरू असलेला निवडणूक रोख्यांचा खेळअखेर सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. सत्ताधारी पक्षांकडून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी धनाढ्यांकडून सुरु असणारा पैशाचा खेळ सुद्धा या निमित्ताने उघडा पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत संवेदनशील निवडणूक रोख्यांवर आज (11 मार्च) सुप्रीम कोर्टाने थेट एसबीआय आणि त्या पाठोपाठ निवडणूक आयोगाला थेट आदेश देत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणी कोणासाठी झोळी रिकामी केली याचाही अंदाज समोर येणार आहे. 

राजकीय पक्षांना सर्वाधिक झटका बसणार 

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दणक्याने अनेकांचे चेहरे यानिमित्ताने उघडे पडणार आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीत तोंडावर राजकीय पक्षांना मदत करणारे हात आणि त्यांची किती कोटींमध्ये मदत झाली आहे याचा सुद्धा पर्दाफाश होणार आहे. ज्या पद्धतीने राजकीय पक्षांना हजारो कोटींची मदत कोणाच्या माध्यमातून आली? कशी आली? याची सुद्धा माहिती आता होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांचे हात पोळले जाण्याची शक्यता आहे.

 राजकीय पक्षांना मिळणारी मदत ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय झाला आहे. त्यामध्ये सतत सत्ताधारी पक्षांनाच होत असलेली मदत ही सुद्धा चिंतनाचा विषय आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिलेला दणका निश्चितच या देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे.   निवडणूक रोख्यांवर सुप्रीम कोर्टाने राजकीय पक्षांचे नाक दाबले; पद्यडामागून हात गरम करून मलिदा खाणाऱ्यांचे तोंडही पोळणार!

 सुप्रीम कोर्टाने लोकशाहीच्या दृष्टीने निवडणूक रोख्यांना असंवैधानिक घोषित करत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना किती निधी प्राप्त झाला आहे याची माहिती उघड करण्यास सांगितलं आहे.
निवडणूक रोख्यांवर सुप्रीम कोर्टाने राजकीय पक्षांचे नाक दाबले; पद्यडामागून हात गरम करून मलिदा खाणाऱ्यांचे तोंडही पोळणार!


सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश ; राजकीय पक्षांना बसून सर्वाधिक झटका