ताज्या बातम्या
शहरातील सी व डी वॉर्डमध्ये दोन दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा
By nisha patil - 2/25/2025 4:55:19 PM
Share This News:
शहरातील सी व डी वॉर्डमध्ये दोन दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा
अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त...
कोल्हापुर शहरात गेले दोन दिवस सी व डी वॉर्डमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा होतोय. सध्या जीबी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केलंय. पण महापालिकेकडुन अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होतोय. सी, डी वॉर्डला बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून तसेच थेट पाईपलाईन योजनेतून पाणीपुरवठा केला जातोय. शनिवारपासून या भागात काळपट, प्रचंड माती असलेल्या पाण्याचा पुरवठा होतोय.
एक दिवस काही तरी कारणाने खराब पाणी आले असेल म्हणून नागरिकांनी ते भरण्याचे टाळले. उद्या तरी स्वच्छ पाणी येईल, असे वाटत होते; पण रविवारीही खराबच पाणी आले. सोमवारीही त्याच प्रकारचा पाणीपुरवठा झाला आहे. पाणी खराब येत असल्याचे सांगूनही अधिकाऱ्यांकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय.
शहरातील सी व डी वॉर्डमध्ये दोन दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा
|