बारामतीत सध्या शाळा कॉलेजमधील मुलं मुली सापडतात लॉजमध्ये

In Baramati currently school college boys and girls can be found in lodges


By nisha patil -
Share This News:



नुकताच बारामती शहर आणि एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या लॉजवर  पोलिसांनी केलेल्या छापेमारीत शाळकरी मुलं-मुली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पंधरा ठिकाणी छापेमारी केली त्यात अनेक लॉजवर महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे. तसेच यामुळे पालकांचे देखील धाबे दणाणले आहेत. ही मुले आणि मुली कॉलेजला जातो असे सांगून घरातून बाहेर पडतात आणि मौजमजेसाठी लॉजवर जातात. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, बारामती परिसरातील जवळपास सर्व लॉज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आहेत. याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी देखील तक्रारी आल्यावर कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. पण शाळकरी मुलांना तासाभरासाठी लॉजमध्ये रुम उपलब्ध करुन देण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापेमारी केली. त्यामुळे आता यापुढे लॉजवर शाळकरी मुले आढळल्यास लॉज मालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत.


In Baramati currently school college boys and girls can be found in lodges