बातम्या

हातकणंगले मतदारसंघात दिवसेदिवस गुंता वाढत चालला आहे

In Hatkanangle Constituency  the problem is increasing day by day


By nisha patil - 3/15/2024 12:19:43 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास आठवडाभराचा कालावधी असतानाच  हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट होण्याच्या चर्चांना उधाण आले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दररोज नवीन नावे चर्चेत येत असल्याने हातकणंगले मतदारसंघातीलवातावरण तापू लागले आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता या मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी दिलीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात थेट नरेंद्र मोदी यांना आवाहन देत दंड थोपटल्याने मोदी लाटेत राजू शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला धैर्यशील माने यांचा पत्ता कट होण्याच्या चर्चांना उधाण होता आणि याच मोदी लाटेवर स्वार होऊन राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी आपल्या त्याने मतदारांवर भुरळ पाडत थेट दिल्लीत धडक मारली होती. कोल्हापुरातील

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात पुलाख  बरेच पाणी वाहून गेले असून शिवसेनेची तसेच राष्ट्रवादीचीही ही दोन शकले झाली त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. मागील निवडणुकीत दोन्हीही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटयाला आले होते. शिवसेनेचे एकनाथ शिंदे
यांनी गतसाली बंड केल्यानंतर कोल्हापुरातून संजय मंडलिक , धैर्यशील माने दोन्हीही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहणे पसंत केले त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून सध्या तरी या दोन्ही जागावर दावा सांगितला जात आहे.

यांच्यासारख्या नेत्यांना  मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या  निमित्ताने आमंत्रित केले जात आहे. भाजपाने केलेल्या सर्वेमध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या बद्दल असलेली नाराजी पाहता हा मतदारसंघ केंद्रातील भाजप सरकारच्या मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण रणनीतीनुसार अबकी बार ४०० पार ही घोषणा प्रत्यक्षात उतरण्यासाठी कोल्हापुरातील दोन पैकी एक मतदारसंघावर भाजपने आपला दावा सांगितला आहे. त्यापैकी हातकणंगले मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भाजपने गेली  तीन वर्षे या मतदारसंघात मजबूत संघटनात्मक पक्ष बांधणी सुरू ठेवली आहे. त्यासाठी गेली तीन वर्ष अनेक दिग्गजांना या मतदारसंघात विविध कार्यक्रमासाठी निमंत्रित  केले जात आहे. केंद्रीय उड्डाण वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्य प्रदेशचे माजी भाजपच्या वाट्याला आल्यास पर्यायी नावांचा विचार भाजपकडून केला जात आहे. या मतदारसंघात महायुतीचे तीन आमदार असल्याने भाजपने आपले सहयोगी पक्ष जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे, 


गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवार यादीमध्ये विधानपरिषद आमदार रयतक्रांती शेतकरी संघटनेचे  सदाभाऊ खोत, भाजपाचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे तसेच याच मतदारसंघातून यापुर्वी निवडणूक लढवून तीन लाखांवर मते घेतलेले आणि सध्या भाजपमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. संजय पाटील यांच्या नावाची ही चर्चा सध्या होत आहे.वंचित च्या उमेदवारांमुळे शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला होता. यावेळी अद्यापही वंचितांना न्याय मिळालेला दिसत नाही. ते अपक्ष लढणार की कोणाला पाठींबा देणार यावर निकाल फिरु शकतो हे मात्र नक्की! विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघात चार हजार दोनशे कोटी रुपयांची कामे केली असल्याचा दावा विधानसभा प्रतिनिधीत्य केला असून महायुतीतर्फे मीच उमेदवार असल्याचे जाहीर करून पंधरा दिवसा पासून मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शाहुवाडी मतदारसंघांचे प्रतिनिधी  करणारे जनसुराज्यचे  प्रमुख आमदार विनय कोरे यांनी आपले नाव चर्चेत आल्यानंतर पत्रकार परिषद घेत लोकसभा लढविण्यास नकार दिला असला तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आग्रह झाल्यास त्यांना नकार देता येणार नाही, तरीही त्यांनी नकार दिला तर पुन्हा धैर्यशील माने यांना भाजपच्या कमळ चिन्हावर लढावे लागेल अशी शक्यता आहे. कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी दोनच दिवसापूर्वी कोल्हापूर विमानतळावर एकनाथ शिंदे यांची घेऊन  चालू असलेल्या घडामोडी बदल माहिती घेत दोन्हीही मतदारसंघ आपल्याकडेच ठेवून आम्ही दोघेही लढत देण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

राष्ट्रवादी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आपाडीला मानणारे तीन आमदार असून काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मानणारा वर्ग ही मोठा आहे. मध्यंतरी त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील लोकसभेला उतरतील अशी चर्चा होती परंतु सध्या तरी महाविकास आघाडीतर्फे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासाठी आग्रह केला जात आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार
यांच्याकडूनही राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतर्फे ही जागा लढवावी यासाठी प्रयत्न केले जात असले तरी राजू शेट्टी यांनी 'एकला चलो रे' या नारा देत आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरूच ठेवली आहे.मलाच आघाडीने पाठीबा द्यावा म्हणून त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. ऐनवेळी राजू शेट्टी यांनी नकार दिलाच तर आपला उमेदवार उतरवण्यासाठी आघाडी च्या वतीने कोल्हापूर येथे बैठक घेऊन या मतदारसंघातील शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर तसेच शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे ऐनवेळी या तिघांपैकी एकाची उमेदवारी  शिवसेना उद्भव ठाकरे गटाकडून होऊ शकते अशी शक्यता आहे. लहुजी परिवर्तन आघाडी च्या वतीने पन्हाळा शाहुवाडी मतदारसंघातील तडफदार नेतृत्व लक्ष्मण शिवाजी तांदळे  तात्या यांनी मतदारसंघात दौरा केला आहे. वाढता पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तांदळे हे विजयी झाले नाही तर यांच्या मुळे काहींचा पराभव होऊ शकतो नक्कीच! एकंदर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट झाल्यास ते कोणती भूमिका घेतील यावरही लढतीचे चिन्ह अवलंबून असणार आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी वगळता सर्वपक्षीय पातळीवर शांतता दिसत असली तरीही दररोज चर्चेत येणाऱ्या नावामुळे हातकणंगले लोकसभा  मतदारसंघातील वातावरण मात्र न उन्हाळ्यात भलतेच गरम होऊ लागले आहे.


हातकणंगले मतदारसंघात दिवसेदिवस गुंता वाढत चालला आहे