बातम्या

इचलकरंजी महापालिकेत आयुक्त पदावरून चांगलाच डाव रंगला

In Ichalkaranji Municipal Corporation


By nisha patil - 6/14/2024 8:17:06 PM
Share This News:



इचलकरंजी महापालिकेमध्ये एकाच वेळी दोन आयुक्त बसल्याने खुर्चीचा रंगलेला डाव पाहायला मिळाला. गेले तीन दिवस हा आयुक्त पदाचा वाद सुरू होता. पैकी इचलकरंजी महापालिकेचे नेमके आयुक्त कोण यावरून वाद रंगला होता. साताऱ्याहून आलेल्या पल्लवी पाटील यांनी आयुक्त पदाच्या खुर्चीवर दावा सांगतला तर ओमप्रकाश दिवटे यांनी स्थगिती मिळाली असल्याचे सांगून हा पदभार आपल्याकडे असल्याचे स्पष्ट केले. अखेर मंत्रालयातून फोन आल्यानंतर या खुर्चीवर ओमप्रकाश दिवटे हे स्थानापन्न झाले.इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना बदलण्यासाठी एक राजकीय यंत्रणा कार्यरत होती. त्यातून दोन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी साताऱ्याच्या पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांनी येऊन पदभार स्वीकारला होता. तथापि त्यानंतर ओमप्रकाश दिवटे यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने पुन्हा दिवटे यांच्याकडे सूत्रे सोपवण्याचे आदेश काल सायंकाळी दिले होते. त्यानुसार आज दिवटे महापालिकेत गेले. पण तत्पूर्वीच पल्लवी पाटील या आयुक्त पदाच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्या होत्या. त्यावरून अधिकृत आयुक्त कोण ? यावरून वाद सुरू झाला. अखेर मंत्रालयातून फोन आल्यानंतर दिवटे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.


इचलकरंजी महापालिकेत आयुक्त पदावरून चांगलाच डाव रंगला