बातम्या
कोल्हापुरात भाजपची अंतर्गत कुरघोडी आणि शिंदेंना मिळाला मोठा नेता
By nisha patil - 6/11/2024 11:08:29 PM
Share This News:
*कोल्हापुरात भाजपची अंतर्गत कुरघोडी आणि शिंदेंना मिळाला मोठा नेता*
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचीच चर्चा सुरु असताना . अनेक नेत्यांची बंडखोरी आणि पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु असून याला कोल्हापूर सुद्धा अपवाद राहिलेला नाही . कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गळती ही भाजप ला लागली असून सुरुवातीला कोल्हापूर भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष समरजीत राजे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला . तर आता कोल्हापूर शहरात भाजपाचा चेहरा असणारे सत्यजित कदम यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला आहे . सत्यजित कदम यांनी २०२२ साली झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत जयश्री जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवताना ७९००० मते घेऊन आपली ताकत दाखवून दिली होती . २०२२ च्या निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर ही त्यांनी मतदारसंघात आपला संपर्क आणि लोकोपयोगी कामांचा धडाका लावल्याने सत्यजित कदम यंदा विजयाचे दावेदार असल्याची चर्चा मतदारसंघात होती मात्र हा मतदारसंघ महायुतीत भाजपा कडे न जाता शिवसेने कडे गेल्याने शिंदेंनी आपले निकटवर्तीय राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली . त्यावेळी संपूर्ण मतदारसंघात सत्यजित कदम बंड करतील अशी चर्चा होती मात्र सत्यजित कदम यांनी युतीधर्माचे पालन करत आपण राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केलें .
भाजपमधीलअंतर्गत कुरघोड्यांना कंटाळून सत्यजित कदम शिंदे सेनेत ..
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपच अस्तित्व अगदीच नगण्य असून २०१९ साली शून्य आमदार असणारी भाजपा यंदाही फक्त दोनच मतदारसंघात लढताना दिसत आहे . अस असूनही भाजप संघटनेमध्ये अंतर्गत विवाद मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे सत्यजित कदम यांनी भाजप मधून शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे .
त्याचबरोबर सत्यजित कदम यांना तिकीट मिळू नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्याने प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे . त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात बळकट करण्यासाठी सत्यजित कदम यांना ताकत देण्याचा शब्द देवून त्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणल्याची चर्चा आहे .
राजेश क्षीरसागर यांनी एका बैठकीत केलेल्या उल्लेखाप्रमाणे सत्यजित कदम यांना राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे हे संधी देणार असून त्याचबरोबर त्यांना शिवसेनेकडून विधानपरिषद देण्याचे आश्वासन मिळाल्याचे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीतून समजते .
कोल्हापुरात भाजपची अंतर्गत कुरघोडी आणि शिंदेंना मिळाला मोठा नेता
|