बातम्या

सदरबाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमा स सुरुवात

In Korgaonkar High School Sadarbazar the governments Happy Saturday initiative started


By nisha patil - 8/7/2024 11:38:28 AM
Share This News:



सदरबाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमा स सुरुवात 

आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदरबाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमा स सुरुवात झाली शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमानुसार विद्यार्थी शाळेमध्ये पुस्तक आणि अन्य शालेय साहित्याविना आले होते दर शनिवारी कला क्रीडा मनोरंजन बौद्धिक व्याख्यान सामान्य ज्ञान कसरत योगा सामुदायिक कवायत समुहगान देशभक्तीपर गीते कथाकथन आदी विविध प्रकारांचे नियोजन यापुढे करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी सांगितले . शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत शनिवारी मनोरंजन या प्रकारामध्ये जादूगार फारूख आब्बास यांनी कलात्मक कौशल्यात्मक आणि हात चलाखीचे विविध प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले . पर्यवेक्षिका प्रमिला साजणे,प्रभू प्रसाद रेळेकर, सुरेखा पोवार, सदाशिव -हाटवळ, शंकर कामत यांनी संयोजन केले . मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी जादूगार फारुख आब्बास यांचा यथोचित मानधन देवून सन्मान केला .


सदरबाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमा स सुरुवात