बातम्या

महाराष्ट्रात प्रथमच घडलं, एक उमेदवार-पक्ष तीन ! श्रीमंत शाहू छत्रपती

In Maharashtra It happened for the first time


By nisha patil - 3/16/2024 12:56:41 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार एक आणि पक्ष तीन हे प्रथमच घडले आहे. त्यानंतर सर्वांचा निर्णय घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय मला मान्य करावा लागला असे मत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले.
 

जनता आणि काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने एकत्र येऊन शाहू छत्रपतींना उमेदवारी द्यावी, हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशा शब्दात कौतुक करत माजी खासदार संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांनी गाफील न राहता शाहू छत्रपतींना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारीपार पाडू असा विश्वास व्यक्त केला.

 न्यू पॅलेस येथे झालेल्या संभाजी राजे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला मेळाव्याला चंदगड, गडहिंग्लज, आजरा, गगनबावडा, पन्हाळा, करवीर तालुक्यातील संभाजीराजे यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ,युवराज्ञी संयोगिता राजे, शहाजी राजे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी. पाटीलयांची प्रमुख उपस्थिती होती.
 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी खासदार संभाजीराजे यांच्या कार्यकर्त्यांची शुक्रवारी सायंकाळी न्यू पॅलेस येथे बैठक झाली. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने बैठकीचे रुपांतर मेळाव्यामध्ये झाले. मेळाव्यात ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .२००९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे यांना ज्या गावात कमी मतदान झाले त्या गावांमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य या निवडणुकीत मिळवण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. संभाजी राजे यांचे कार्यकर्ते ताकदीने प्रचारात उतरणार असून श्रीमंत शाहू छत्रपती यांना खासदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

मेळाव्याला नंदू ढेरे, संतोष सुतार, सुरज माने, सचिन घोरपडे, अशोक शिराळे, प्रवीण ढोणे, निखिल निंबाळकर, मनोज पाटील, जयवंत पताडे, राजेंद्र पाटील, जनार्दन  यादव, बाजीराव चव्हाण, संदीप चौगुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्रात प्रथमच घडलं, एक उमेदवार-पक्ष तीन ! श्रीमंत शाहू छत्रपती