बातम्या

मोरेवाडीत गावठी दारु हातभट्टीवर छापा

In Morewadi Gavathi Daru was raided on hand furnace


By nisha patil - 6/4/2024 6:53:44 PM
Share This News:



जिल्हयातील अवैद्य व्यवसायाच मोडीत काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सागर वाघ व इतर पोलीस अमंलदार यांचे पथकाने पहाटे कंजारभाट वस्ती मोरेवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु तयार करणा-या भट्ट्यावर एकूण 08 ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या. यामध्ये सुमारे 61,550/- रुपये किंमतीचा मुद्देमाल नाश केला. यावेळी प्रकाश बागडे, शक्ती  माटुंगे, चरण विरसिंग बागडे, प्रमोद  बागडे,  मनोज  मिणेकर,शेखर  मछले,  अजित  बाटुंगे व  रोहित  माटुंगे सर्व
रा.कंजारभाट वसाहत यांचे विरुद्ध राजारामपूरी येथे गुन्हा दाखल केला आहे.सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सागर वाघ,शहनाज कनवाडे, अमर आडूळकर, अमित सर्जे, विनायक चौगुले, युवराजपाटील, संतोष पाटील, ओंकार परब व प्रविण पाटील यांनी मिळुन केली आहे.


मोरेवाडीत गावठी दारु हातभट्टीवर छापा