बातम्या

पन्हाळा तालुक्यात वानरांचा वावर वृक्षांच्या मुळावर

In Panhala taluka monkeys roam on the roots of trees


By nisha patil - 5/17/2024 4:40:52 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी पन्हाळा तालुक्यात शेताच्या बांधावर असणाऱ्या झाडांवर उपद्रवी वानरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दिवसाढवळ्याबी लहान-मोठ्या झाडांच्या कत्तली होत आहेत. वानरांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पिकांचे संरक्षण करण्यासाठी वानरांचे आश्रयस्थान असणाऱ्या या झाडांच्या मुळावर नाइलाजाने शेतकऱ्यांकडून घाव घातला जात आहे. वन खात्याकडून वानरांचा बंदोबस्त झाल्यास, आहे ती तरी वृक्षसंपदा
टिकून राहील. पावसाळा सुरू झाला की, वृक्षारोपण करणाऱ्यासाठी शासन स्तरावर मोठमोठ्या योजना राबवल्या जातात. पर्यावरण संतुलित राहावे यासाठी भरपूर निधी खर्च केला जातो. नवीन झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाते; पण आहे त्या जुन्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी कोणत्याही  प्रकारचे प्रयत्न शासन स्तरावर केले जात नाहीत. ग्रामीण भागात शेताच्या बांधावर आंबा, फणस, चिक्कू, वानरांचा वावर नको म्हणून बांधावरील झाडे तोडली जात आहेत.

शेताच्या बांधावरील झाडांवर वानरांचा वावर वाढल्याने पिकांचे  नुकसान होत आहे. त्यांना हुसकावून लावण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरल्याने नाइलाजाने ही झाडे तोडावी लागत आहेत. वन खात्याने या वानरांचा बंदोबस्त केल्यास, आहे ती झाडे तोडली जाणार नाहीत. नारळ, सागवान इत्यादी वृक्ष मोठ्या प्रमाणात लावले जातात.   दिवसभर शेतातील पिकांचा फडशा पाडत मोठ्या प्रमाणात नुकसान करून वानरे झाडांवर ठिया मारून राहतात. त्यांना हाकलूनलावण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाय केले जातात; पण झाडाच्या उंच शेंड्यावर जाऊन बसलेल्या वानरांना वृक्षारोपणाची ऐसी की तैसी जशा उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत, तसं 'झाडे लावा... झाडे जगवा' या घोषवाक्याचे संदेश समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. पावसाळ्याच्या प्रारंभी अनेक सामाजिक संस्था मोठा गाजावाजा करून वृक्षारोपण करता; पण पुढे ती रोपे पाण्याअभावी अर्धमेली होऊन जीव सोडतात. 

पुन्हा दुसऱ्या वर्षी पावसाळ्यात त्याच खड्यात झाडे लावली जातात. वृक्षारोपणाची 'ऐसी की तैसी' सुरू आहे. विश्रांतीसाठी शेतात झाड नाही वानरांकडून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कुन्हाड हातात घेत मोठी झालेली झाडे तोडायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम असा झालाय की, उन्हात शेतात काम करत असताना दोन मिनिटे विश्रांती घ्यावी म्हटले तरी शेतात एक झाड नाही. हाकलून लावताना त्यांची दमछाक होते. नाइलाजाने मग शेतकऱ्यांकडून हातात कुन्हाड घेतली जाते. मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या पिकांची वाताहत नको म्हणून शेतकरी बांधावरची झाडे तोडत आहेत. पर्यायाने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. झाडे तोडल्यावर वानरे दुसऱ्या ठिकाणी आपला मोर्चा वळवतात. एकदा झाडे तोडली की परत तिथे झाडे लावली जात नाहीत, त्यामुळे शेती हिरवीगार आहे पण झाडे नसल्याने शिवार ओसाड दिसत आहे. नवीन झाडे लावण्याबरोबरच आहे त्या झाडांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी वन खात्याने वानरांचा ठोस बंदोबस्त करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.


पन्हाळा तालुक्यात वानरांचा वावर वृक्षांच्या मुळावर