बातम्या

पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर

In Pune an incident that casts a pall over humanity is in front of us


By nisha patil - 2/15/2024 5:40:23 PM
Share This News:



पुणे : पुण्यात अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या पुण्याला आपण शिक्षणाच माहेर घर मानतो त्याच पुण्यात ही  लाजिरवाणी घटना घडली आहे. ण याच विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी तिला डांबून ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. संबंधित प्रकार हा अक्षरशः  किळस वाटावा असा आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतेलेले अवघ्या 30 हजार रुपयांसाठी आरोपींनी हे कृत्य केल्याचं उघडकीस आला आहे. यामुळे संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जात आहे 

पोलिसांनी  दिलेली माहिती अशी की,पंडितेचे वडील आजारी असताना तिने  फिर्यादी दाम्पत्ययाकडून उपचारासाठी 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र काही कारणामुळे फिर्यादी यांना ते पैसे परत देता येत नसल्याने आरोपींनी तिला एका लॉज वर नेऊन तिला १५ दिवस डांबून ठेवलं.या  ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दांपत्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने शरीर विक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करून आरोपींनी पैसे कमावले. भरती विद्यापीठ पोलिसांना काल पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. आता ज्या लॉज वर हे प्रकार घडले आहेत त्या सर्व लॉज मालकांची देखील चौकशी आता पोलीस करणार आहेत. याप्रकरणी आकाश ची पत्नी पूनम हिला अटक केली असून आकाश माने सध्या फरार आहे. त्याचा पोलीस  तपास  करत आहेत


पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर