बातम्या
शहाजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास पुस्तके भेट
By nisha patil - 10/2/2024 1:28:31 PM
Share This News:
कोल्हापूर:श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील पाच विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांच्याकडे ही पुस्तके विद्यार्थ्यांनी सुपूर्द केली. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एन. एस जाधव, डॉ.राज बिरजे, आई क्यू ए सी विभाग प्रमुख डॉ.आर.डी.मांडनीकर, डॉ.सुरेखा मंडी, डॉ.शोभा चाळके, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यावेळी उपस्थित होते.
बीए भाग तीन मधील विद्यार्थिनी दर्शना नामदेव कांबळे, गौरी शहाजी काशीद, साक्षी बाळासाहेब शिंदे, दिशा बाजीराव मन्नाडे, समीना सिकंदर शेख या विद्यार्थिनींनी आपल्या वाढदिवसानिमित्त ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी, इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोझिशन, वाईज अँड अदरवाईज,आयसीएफ कॅन्डी मॅन, ग्रामर मेड इझी ही पुस्तके भेट दिली.
यावेळी प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पुस्तके ही तुमचे चांगले मित्र आहेत. ते कधीही बेइमानी करत नाहीत. त्यांच्या संगतीने विद्यार्थ्यांच्या जीवनात समृद्धता येईल असा आशावाद प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाणी यांनी व्यक्त केला.
स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एन. एस जाधव यांनी केले. राज प्रा. डॉ.राज बिरंजे यांनी संयोजन केले. ग्रंथपाल डॉ पांडुरंग पाटील यांनी सर्वांचे आभार मानले .
संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
शहाजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास पुस्तके भेट
|