बातम्या
शिरढोणमध्ये शेतमजूर संघटनेचे प्राणांतिक उपोषण मागे
By nisha patil - 11/16/2023 7:28:59 PM
Share This News:
शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील गावकामगार तलाठी रवि रमेश कांबळे याची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी या मागणी साठी महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटना यांच्या वतीने शोभा पाणदारे, संगिता सुतार आदींनी प्राणांतिक उपोषणा सुरु केले होते यावेळी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्या लेखी आश्वासनानंतर प्राणांतिक उपोषण मागे घेण्यात आली
शिरढोण येथील येथील गाव कामगार तलाठी रवि कांबळे यांच्याकडे गोरगरीब लोकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळावा म्हणून उत्पन्नाचा दाखला मागणीचे प्रस्ताव दिले होते, सदरचे प्रस्ताव देऊन देखील तलाठी रवी कांबळे दाखला देण्यासाठी वेळ काढूपणा केला आहे.तसेच ज्यांचे जादा उत्पन्न आहे त्यांना माञ आर्थिक तडजोड करून लगेच दाखले दिले आहेत आणि खऱ्या लाभार्थ्याला मात्र लाभापासून हेतू पुरस्कर वंचित ठेवण्याचा प्रयत्न तलाठी करत आहेत. तलाठी यांच्या संपूर्ण कारभाराची खातेनिहाय चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने प्राणांतिक उपोषण सुरु केले होते.यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष पळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता
आंदोलन स्थळी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी येऊन तलाठी रवि कांबळे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत त्यांना धारेवर धरून जाब विचारला त्यांनी नोंदी तपासून ५१ उत्पन्नाच्या दाखल्यापैकी ४३ जणांना पात्रठरवून ,४ जणांची स्थानिक चौकशी करून अपात्र ठरविले , दरम्यान ११ लोक जादा उत्पन्न असून देखील पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची स्थानिक चौकशी करून पात्र अपात्र ठरविण्यात येईल व याचा अहवाल तीन आठवड्यात आल्यानंतर जरूर ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले
यावेळी शेतमजूर संघटनेचे संस्थापक सुरेश सासणे, विश्वास बालीघाटे, सरपंच बाबासाहेब हेरवाडे, पोलीस पाटील अनुराधा जाधव, दत्तात्रय लाळगे पाटील, विजय सूर्यवंशी,विजय मगदूम महादेव पाणदारे,हैदरअली मुजावर,मंडळ अधिकारी मच्छिंद्र कुंभार, तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे शिरदवाडचे तलाठी सुरेश खोत, यड्रावचे तलाठी गणेश आवळे आदी उपस्थित होते
शिरढोणमध्ये शेतमजूर संघटनेचे प्राणांतिक उपोषण मागे
|