शैक्षणिक
खासगी बालवाड्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण येण्याच्या तयारीत
By nisha patil - 1/22/2025 5:27:37 PM
Share This News:
खासगी बालवाड्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण येण्याच्या तयारीत
राज्यातील 3 ते 6 वयोगटातील 32.49 लाख मुलं खासगी बालवाड्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, या बालवाड्यांवर कोणतेही सरकारी नियंत्रण नसल्याने त्या पार्किंगच्या जागेत, घरामध्ये किंवा इतर ठिकाणी चालवल्या जात आहेत. हे नियंत्रणाखाली आणण्यासाठी राज्य शासनाकडून नियमावली तयार करण्याचे काम सुरू केले आहे
शालेय शिक्षण विभागाने आता खासगी बालवाड्यांसाठी नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे योग्य सुविधा, शैक्षणिक अभ्यासक्रमांचे पालन आणि मुलांच्या हितासाठीच्या योजना राबवल्या जातील.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतरही खासगी बालवाड्यांवर कोणतेही नियम लागू नाहीत. या निर्णयामुळे मुलांच्या शिक्षण व सुरक्षिततेला महत्त्व मिळेल, अशी पालक व तज्ज्ञांची अपेक्षा आहे.
खासगी बालवाड्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण येण्याच्या तयारीत
|