बातम्या
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळी जादू, लिंबु, मिरची...
By nisha patil - 4/13/2024 10:57:22 PM
Share This News:
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळी जादू, लिंबु, मिरची...
मतदारांवर दबाव टाकण्यासाठी असेही प्रकार..
असं करत असाल तर व्हा सावध
सध्या देशांमध्ये लोकसभा निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीच्या लढती अत्यंत चुरशीने होत आहेत त्यामुळे काही उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवार व मतदारावर दबाव निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार करत आहेत लोकसभा निवडणुकीत अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे आणि आचारसंहितेचा भंग ही आहे मतदारांच्या मनात अंधश्रद्धेची भीती निर्माण करणाऱ्या या प्रकारांमध्ये नारळावर हात ठेवून विशिष्ट व्यक्तीला मत देण्याची शपथ घ्यायला लावणे, देवाचा अंगारा उचलून मत देण्याविषयी कबूल करून घेणे, तांत्रिक लोकांना गावांमध्ये बोलवून महिला मतदारावर दबाव आणणे, विरोधी उमेदवाराच्या अंगणात काळी बाहुली, लिंबू ,मिरची नारळ याचा उतारा ट** विरोधी उमेदवारावर काळी जादू, करणी चा प्रकार करणे असे अंधश्रद्धेचे अनेक प्रकार सध्या निवडणूक काळात घडत आहेत तसेच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार देखील असे प्रकार करून दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मत आहे असे अंधश्रद्धेचे प्रकार आढळल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शी संपर्क करावा असे आवाहन अनिस च्यावतीने करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळी जादू, लिंबु, मिरची...
|