बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरवात

In the background of the Lok Sabha elections political accusations and counter accusations have started


By nisha patil - 3/14/2024 5:19:59 PM
Share This News:



लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरवात

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे  वारे वाहू लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्याचा चंग सत्ताधारी भाजप-एनडीएने  केला आहे. तर, दुसरीकडे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार विरोधक इंडिया आघाडीने केला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून टीकेला धार आली आहे. अशातच दुसरीकडे  बॉक्स ऑफिसवरही राजकीय वातावरण तापणार आहे.

सत्ताधारी भाजपला अनुकूल असलेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत. 'आर्टिकल 370' या चित्रपटाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी एका सभेतही केले होते. त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या दरम्यान काही चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. या चित्रपटांतून थेट राजकीय भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटांच्या टायमिंगवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

काही दिवसांपूर्वी आर्टिकल 370 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दहशतवादी कारवाया, संविधानाने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यासाठी केंद्र् सरकारने उचललेली पावले आदी मुद्यांचा परामर्श करण्यात आला होता. जम्मूतील सभेत पंतप्रधान मोदी यांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरवात