बातम्या

कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी मैलामिश्रीत पाणी रोडवर - शुभम सावर्डेकर

In the city of Kolhapur


By nisha patil - 12/21/2023 1:36:00 PM
Share This News:



कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी मैलामिश्रीत पाणी रोडवर - शुभम सावर्डेकर

कोल्हापूर  शहरासह उपनगरात महापालिकेच्या कचखाऊ धोरणामुळे  रस्त्यावर गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील मुख्य गजबजलेल्या राजारामपुरी,ताराबाई पार्क,परीघ पुल,लक्ष्मीपुरी, नागाळा पार्क आदी गजबजलेल्या रोडवर विवेकानंद काँलेज समोरच गटाराचे सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने दुर्गंधी पसरली आहे . या रस्त्यावर शहरातील मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. हा रस्ता गजबजलेला असून कायम वर्दळ असते. येथील नागरिक या दुर्गंधीला वैतागले आहेत . सध्या कडाक्याची थंडी,त्यातच दुषित वातावरण आल्याने मलेरीया , थंडीताप, डायरीया सारख्या साथीच्या रोगाची वाढ मोठ्याप्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही . मोटार सायकल वरुन प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराना पण पाण्यातून मार्ग काढत असताना हे दुर्गंधीयुक्त पाणी अंगावर येत आहे . जवळच जोड हनुमान मंदिर असून येथे भाविकांची वर्दळ असते त्यामुळे त्यांना सुद्धा नाहक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांची उधळण शहरातील स्वच्छतेवर करण्यात येत असून नेमकी स्वच्छता कुठल्या भागातील करण्यात येते असा सवाल नागरिक करत आहेत. ही कंत्राटदाराला पोसण्यासाठी उठाठेव असल्याचे नागरीक चर्चा करत आहेत.
तरी संबंधित अधिकारी यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर, आंदोलन करणार असल्याचे संयुक्त ताराबाई पार्क तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम सावर्डेकर यांनी सांगितले.


कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी मैलामिश्रीत पाणी रोडवर - शुभम सावर्डेकर