बातम्या

अखेर महायुतीकडून साताऱ्यातील खासदार उदयनराजेंच..

In the end the MP from Satara Udayanraj is from Mahayuti


By nisha patil - 3/26/2024 3:35:38 PM
Share This News:



गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याच्या जागेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीमधला  तिढा काही सुटता सुटत नव्हता पण आज अखेर तो तिढा सुटल्याच चित्र दिसत आहे.  साताऱ्याबाबत एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सातारा लोकसभेसाठी छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर साताऱ्यातून पुन्हा खासदार उदयनराजे यांनाच भाजपकडून उमेदवारी दिली जाणार   आहे
 

.उद्या याबाबत महायुतीकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र महायुतीच्या प्रचाराचा नारळ माढा लोकसभेतील माळशिरस येथे उद्या फुटणार असून त्यानंतर खासदार उदयनराजे आपल्या प्रचाराचा प्रारंभाला सुरुवात करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे


अखेर महायुतीकडून साताऱ्यातील खासदार उदयनराजेंच..