बातम्या

पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातलेला 'जवान' दुसऱ्या आठवड्यात मात्र .....

In the first week


By nisha patil - 9/15/2023 8:04:34 PM
Share This News:



शाहरुख खान, विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्या 'जवान'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे. अवघ्या आठवडाभरात या चित्रपटाने अनेक मोठे रेकॉर्ड मोडले आहेत. ५७ वर्षीय शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर धमाकेदार अ‍ॅक्शन करताना पाहून त्याचे सगळेच चाहते झाले आहेत. साऊथ तडका असलेल्या या चित्रपटात किंग खानची दुहेरी भूमिका आहे. सस्पेन्स, अॅक्शन आणि आकर्षण यामुळे 'जवान'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. जवान या चित्रपटाला ८ व्या दिवशी मोठा धक्का बसला. दुसऱ्या गुरुवारी चित्रपटाच्या व्यवसायात २२.४१ टक्क्यांची घट झाली. म्हणजेच सातव्या दिवसाच्या तुलनेत 'जवान'ची कमाई २३ कोटींवरून १८ कोटींवर घसरली आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक अजूनही 'जवान' सोबतच महिन्याभरा पूर्वी रिलीज झालेल्या सनी देओलचा 'गदर २' पाहण्यासही पसंती देत आहेत.'जवान'ने बॉक्स ऑफिसवर एक आठवडा पूर्ण केला आहे. ७ सप्टेंबरला रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या चित्रपटाने या ८ दिवसांत एकूण ३८६.२८ कोटींचा व्यवसाय केला आहे. सर्वाधिक कमाई हिंदीतून झाली आहे. 'जवान'ने हिंदीमध्ये ३४५.८८ कोटी, तमिळमध्ये २३ कोटी आणि तेलुगूमध्ये १७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.


पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातलेला 'जवान' दुसऱ्या आठवड्यात मात्र .....