बातम्या

जादुटोण्याच्या नावाने पुण्यात महिलेला घातला 15 लाखांचा गंडा

In the name of witchcraft


By nisha patil - 5/14/2024 8:48:46 PM
Share This News:



पुण्यातून आता अनेक जादुटोण्याच्या बातम्या देखील समोर येत आहे. पुण्याच्या वैकुंठात रात्री बे रात्री करणी केल्याच्या पुजा आणि येशूचं रक्त म्हणून लोकांना प्यायला दिल्यानंतर आता पुण्यातून जादुटोण्याच्या नावाने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. काळी जादू घालवतो म्हणत ज्योतिषाने महिलेला घातला 15 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.  पुण्यातील वानवडी  परिसरात ही घटना घडली आहे.तुमच्या घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे, त्यासाठी पूजा करावी लागेल, असे बतावणी करून तरुणीला 15  लाख 30 हजारांचा गंडा घालता आहे.
 

फिर्यादी यांची उत्तर प्रदेश मधील एका ज्योतिषी याच्याशी ओळख झाली होती. आपले पती सोबत नेहमी भांडण होतंय, असे तिने ज्योतिषी तिवारी याला सांगितले. यावर तुमच्या घरावर कोणी तरी काळी जादू केली आहे, ती नष्ट करतो, असे सांगत एके दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालून त्या तरुणीच्या घरी गेला. पूजा झाल्यावर प्रसादात त्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीचे अंतर्वस्त्रातील फोटो काढले. हे फोटो तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या इतरांना पाठवेल अशी धमकी देत त्याने वेळोवेळी पैशांची मागणी केली. धमकीला घाबरून त्या तरुणीने 15 लाख 30 हजार रुपये त्याला पाठवले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली आहे.


जादुटोण्याच्या नावाने पुण्यात महिलेला घातला 15 लाखांचा गंडा