बातम्या

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार नेते संजय पाटील यांचा पक्षप्रवेश

In the presence of Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao farmer labor leader Sanjay Patil joined the party


By Administrator - 1/9/2023 11:41:13 AM
Share This News:



तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार नेते संजय पाटील यांचा पक्षप्रवेश

अखिल भारतीय किसान काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र तसेच कोल्हापूर व राज्यातील जनसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, रेशन ग्राहकांच्या  ,शेतकऱ्यांच्या कामगारांच्या प्रश्नांवर शेकडो लक्षवेधी आक्रमक आंदोलन करणारे संजय पाटील यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री निवासामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला .यावेळी महाराष्ट्र राज्याचे बी आर एस पक्षाचे प्रभारी के वामशीधर राव हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी प्रक्ष प्रवेशाच्या वेळी श्री संजय पाटील यांच्याशी कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनुषंगाने जवळपास अर्धा तास तेलंगणा मुख्यमंत्री यांनी चर्चा केली व महाराष्ट्रातील सध्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पक्ष बळकर करण्यासाठी ग्राम पातळीपासून सुरुवात करून पक्षांतर्गत असणारे नऊ सेल त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती तातडीने करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या ,वंचितांच्या बळावर पक्षाचे स्वबळावर सरकार आणायचे आहे असे ते यावेळी म्हणाले. संजय पाटील यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे दहा वर्ष जिल्हाध्यक्ष पद सांभाळले होते त्या माध्यमातून त्यांनी शेकडो आंदोलने केलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा एक आश्वासक चेहरा म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी यांनी संजय पाटील यांना ग्रीन सिंगल दिलेला आहे. लवकरच पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून पक्षाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये शाखा स्थापन करण्यात येणार असून तालुका पातळीवर प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार असल्याचे संजय पाटील यावेळी म्हणाले
 

पक्षप्रवेशावेळी महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे प्रभारी के वामसीधर राव, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब देशमुख ,माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी संजय पाटील यांच्यासह जिल्हा समन्वयक तोहीद बक्षु ,दिलीप चव्हाण, पंचायत समिती माजी सदस्य बाबुराव पाटील ,सतीश मोठे ,भीमराव पाटील ,राजेंद्र कलमाडी आदी उपस्थित होते.


तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार नेते संजय पाटील यांचा पक्षप्रवेश