बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये केला जाहीर प्रवेश

In the presence of the Chief Minister


By nisha patil - 5/5/2024 4:47:48 PM
Share This News:



हातकणंगले:  लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज जयसिंगपूर येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून महायुतीच्या उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले. 
 

जयसिंगपूरमध्ये काय वारे वाहतात त्याला राजकारणात फार महत्त्व आहे. यंदा राजेंद्र पाटील यड्रावकर आणि धैर्यशील माने यांनी केलेल्या कामांचा जोरावर मते मागायला आलो असल्याचे यावेळी उपस्थित जयसिंगपूर येथील नागरिकांना संबोधित करताना सांगितले. सध्या देशातील वातावरण हे विकासाला पोषक वातावरण आहे त्यामुळे संसदेत तुमच्या भागातील तरुण रक्ताला पुन्हा संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 
 

कोल्हापूरात महापूर आला तेव्हा या भागात आलो होतो. त्यावेळी दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेले होते. त्यावेळी इथल्या लोकांची माणुसकी पहायला मिळाली होती. मात्र आता पुन्हा या भागात कधीही पूर येणार नाही. कारण वर्ल्ड बँकेच्या मदतीने ३२०० कोटींचा डीपीआर आपण तयार करत आहोत, तसेच पंचगंगेच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी देखील निधीची तरतूद केल्याचे सांगितले. 
 

महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात तर मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशात प्रचंड काम केले आहे. येथील संतुबाई हेरवाड मंदिराला ४ कोटींचा निधी देऊ असे सांगितले. तसेच जयसिंगपूर येथील झोपडपट्टी नियमित करण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर बैठक घेऊन निर्णय करू असेही स्पष्ट केले. 
यावेळी शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला तसेच शिरोळ येथील कोळी महासंघाने धैर्यशील माने यांना आपला पाठींबा जाहीर केला.   

 

यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, संजय पाटील यड्रावकर, गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक माधवराव घाटगे, माजी मंत्री निवेदिताताई माने, पुंडलिक जाधव, विजय भोजे, राज्यवर्धन निंबाळकर, रजनीताई मकदुम, जयदीप कवाडे तसेच महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये केला जाहीर प्रवेश