विशेष बातम्या

मालमत्ता कर सॉफ्टवेअरमध्ये त्वरीत बदल करण्याची इनाम संघटनेची महापालिकेकडे मागणी

Inam Association demands to the Municipal Corporation for quick changes in the property tax software


By nisha patil - 6/15/2023 6:19:56 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी इचलकरंजी शहरातील विविध प्रकारात वाढलेला मालमत्ता कर नुकताच महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कमी करण्यात आला आहे.परंतू ,मालमत्ता कर भरण्यासाठी असलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये अजूनही जुनाच कर दाखवत असून त्याबाबत सुधारणा करून कमी झालेला घरफाळा दिसावा ,जेणेकरून मालमत्ताधारकाना ऑनलाईन घरफाळा भरणे सोयीस्कर होईल , अशा मागणीचे निवेदन इनाम संघटनेच्या वतीने प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांना देण्यात आले.
यावेळी त्यांनी याबाबत आदेश दिलेले असून लवकरच सदर काम पूर्ण होईल. त्यानंतर ऑनलाईन घरफाळा भरण्याचे काम सुलभ होईल असे सांगितले.तसेच वाढीव रक्कम प्रिंट झालेल्या घरफाळा पावत्यावर शिक्का मारला असून त्यामध्ये वाढलेले कर वगळून भरण्याचे आवाहन केले आहे.ज्या मिळकतधारकांनी वाढीव दराने घरफाळा भरला आहे , त्यांची रक्कम पुढील घरफाळ्यातून वजा करण्यात येणार असल्याचे सांगितले.घरफाळा भरताना संयुक्त करात दिलेला रिबेट कायम असून त्यामध्ये कसलाही बदल करण्यात आला नसल्याचे करअधीक्षक अरिफा नुलकर यांनी सांगितले.
यावेळी इनाम संघटनेचे राजू कोन्नूर,राम आडकी,उदयसिंह निंबाळकर,संजय डाके,महेंद्र जाधव,लक्ष्मण पाटील,दीपक अग्रवाल,डॉ सुप्रिया माने,कल्पना माळी, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.


मालमत्ता कर सॉफ्टवेअरमध्ये त्वरीत बदल करण्याची इनाम संघटनेची महापालिकेकडे मागणी