बातम्या
कणेरीत न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा...
By nisha patil - 2/26/2025 8:43:40 PM
Share This News:
कणेरीत न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा...
न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटलात दाखल.....
सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरीत न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सानिध्यात ना.प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलाय. स्वामीजींच्या सारख्या कर्मयोगी संतांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले तर कोल्हापूरचे नव्हे तर राज्यभरात कार्याचा आदर्श घालून देता येईल.
स्वामीजींच्या सामाजिक कार्यात आम्हाला सहभागी होऊन सेवा करण्याची ग्वाही यावेळी ना.प्रकाश आबिटकरांनी व्यक्त केली. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, गोकुळ दुध संघ संचालक नंदकुमार ढेंगे, विश्वस्त उदय सावंत, दिवाकर पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातून आलेले हजारो भाविक उपस्थित होते.
कणेरीत न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा...
|