बातम्या

श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हील सर्व्हिसेसचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

Inauguration ceremony of Shraddha Institute of Civil Services concluded in Dimakh


By nisha patil - 4/12/2023 7:26:32 PM
Share This News:



श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हील सर्व्हिसेसचा उद्घाटन सोहळा  रविवारी   घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमास  कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी . राहुलजी रेखावार , त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त  ओमप्रकाशजी दिवटे , इचलकरंजी विभागाच्या प्रांताधिकारी  मौसमी चौगुले , मा. लेफ्ट. कर्नल प्रिन्स पॉल, मा. लेफ्ट. कर्नल राजेंद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 सिव्हील सर्व्हिसेस हे करियर नसून समाजसेवेसाठी घेतलेले व्रत आहे. हे धनुष्य हाती घेण्याअगोदर विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, चिकाटी, सातत्य व आत्मविश्वास ही चतुःसूत्री आत्मसात करावी. कठोर मेहनत, प्रचंड अभ्यासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्याचा मूलमंत्र रेखावा र साहेबांनी विद्यार्थ्यांना दिला. 

लेफ्ट कर्नल प्रिन्स पॉल व लेफ्ट. कर्नल राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांनी परिस्थितीला शरण न जाता प्राप्त परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले. यावेळी  राज शेखर सरांनी विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेसंदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा हस्ते चालू घडामोडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष . ए. आर. तांबे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन . मनीष आपटे यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक एम. एस. पाटील सर, . सुप्रिया कौंदाडे , . संगीता पवार ,  अक्षय तांबे , अभिषेक तांबे , . सृष्टी तांबे  इत्यादींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व संस्थेवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हील सर्व्हिसेसचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न