बातम्या
श्री विठ्ठल कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न...
By nisha patil - 2/24/2025 2:57:17 PM
Share This News:
श्री विठ्ठल कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न...
येत्या काळात सहकार टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची : आ.सतेज पाटील
यवलूज येथे श्री विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांच्या हस्ते तसेच आ.सतेज पाटील आणि राहुल पाटील-सडोलीकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना आ.सतेज पाटील म्हणाले की,सहकाराच्या माध्यमातून यवलूज गावाने सर्वांगीण विकास साधला आहे.
आपल्या पूर्वजांनी शास्वत विकासासाठी सहकाराशिवाय पर्याय नाही हे ओळखले होते. त्यामुळे येत्या काळात सहकार टिकवायची जबाबदारी आपली असणार आहे अशा भावना यावेळी त्यांनी मांडल्या. यावेळी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, बी.एच. पाटील, जिल्हा बॅंकेच्या संचालिका शृतिका काटकर, बाजार समिती सभापती प्रकाश देसाई, सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी आणि सभासद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री विठ्ठल कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न...
|