बातम्या
विद्यापीठातील ई- कंटेंट निर्मिती कार्यशाळेचे उद्घाटन
By nisha patil - 1/29/2025 9:41:26 PM
Share This News:
ई- कंटेंट निर्मितीवर कार्यशाळा – शिवाजी विद्यापीठात आयोजन
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन केंद्र आणि एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ ई- कंटेन्ट फाॅर ऑनलाईन लर्निंग अँड मूक्स' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सत्रात मुंबई येथील महास्वयंम ऑनलाइन कोर्सचे प्रशिक्षक गणेश लोखंडे यांनी ई- कंटेंट निर्मितीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधींबद्दल माहिती दिली. डॉ. रामचंद्र पवार यांनी शिवाजी विद्यापीठाच्या पाठिंब्याचा उल्लेख केला. दुसऱ्या सत्रात सायबर इन्स्टिट्यूटचे डॉ. राजेंद्र परीजात यांनी डिजिटल मीडिया व फिल्म कंटेंटचे प्रात्यक्षिकाद्वारे विश्लेषण केले. कार्यशाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विद्यापीठातील ई- कंटेंट निर्मिती कार्यशाळेचे उद्घाटन
|