बातम्या

कन्या महाविद्यालयात युवती स्वसंरक्षण शिबिराचे उद्घाटन

Inauguration of Girls Self Defense Camp in Kanya College


By nisha patil - 7/17/2023 6:22:37 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग कोल्हापूर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव विद्या मंदिरच्या  स्वाती शिंदे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थीनींना स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी पोलिस प्रशासन आणि महिलांसाठी असणारे कायदे, तंत्रज्ञान ,महिला व मुलींना असलेले धोके याबाबत मार्गदर्शन केले.महिला व बालकल्याण विभागामार्फत लता पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सुमित महाजन उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ त्रिशला  कदम यांनीही अनमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक डॉ.धीरज शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.संपदा टिपकुर्ले यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉक्टर विठ्ठल नाईक यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते,प्रशासकीय सेवक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कन्या महाविद्यालयात युवती स्वसंरक्षण शिबिराचे उद्घाटन