बातम्या

‘गोकुळ’ शॉपी चे कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे उद्‌घाटन

Inauguration of Gokul Shop at Kagal Five Star MIDC


By nisha patil - 11/5/2024 2:58:55 PM
Share This News:



कोल्हापूर ता.११: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ च्‍या वतीने श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत जि. कोल्हापूर येथे दि.१०/०५/२०२४ इ.रोजी अक्षय्यतृतीयाच्या मुहूर्तावर संघाच्या गोकुळ शॉपीचे उद्‍घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने आपल्या गुणवतेच्या जोरावरती आपल्या ग्राहकांना भुरळ घातली असून गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठया प्रमाणात मागणी आहे. कागल पंचतारांकित एम.आय.डी.सी. परिसरातील ग्राहक, कर्मचारी यांच्यासाठी गोकुळ दूध, श्रीखंड, आंबा श्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर, बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क व्हॅनिला,पिस्ता,चॉकलेट व स्ट्रॉबेरी तसेच टेट्रा पॅकिंगमध्ये व्हॅनिला व मँगो लस्सी, मसाला ताक इत्यादी दूग्धजन्य पदार्थ या शॉपीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध ठेवले जाणार आहेत. निश्चीतच गोकुळच्या दुध व दुग्धजन्य पदार्थ याची चव आवडेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.    

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर,  प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्‍ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, प्रकाश आडनाईक, पशुखाद्य व्यवस्थापक व्ही.डी.पाटील, मानसिंग देशमुख, बी.पी.पाटील, व्ही.टी.पाटील,मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, शॉपीचे मालक सचिन गोजारे, प्रथमेश सावंत, देवदत्त चौगले, अवधूत चौगले आदी उपस्थित होते.


‘गोकुळ’ शॉपी चे कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे उद्‌घाटन