बातम्या
पश्चिम महाराष्ट्र सर्वात अद्यावत कॅन्सर सेंटरच्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन
By nisha patil - 1/2/2024 12:51:29 PM
Share This News:
कोल्हापूर - उजळाईवाडीजवळील कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये उभारण्यात आलेला अत्याधुनिक मॉड्युलर शस्त्रक्रिया विभाग व अद्यावत अतिदक्षता विभागाचे उद्घाटन महाराष्ट्र
शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आले
राज्यातल्या एकही माणूस उपचाराशिवाय किंवा त्यांच्याकडे पैसे नाही म्हणून दगावता कामा नये, हा एकच उद्देश घेऊन महाराष्ट्र शासन कार्यरत आहे असे डॉ. शेटे यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अद्यावत कॅन्सर सेंटर असून सर्व स्तरातील जनतेला कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये अत्याधुनिक उपचार मिळतात हीच या हॉस्पिटलची सर्वात मोठी कमाई आहे असे ही डॉ.शेटे यावेळी म्हणाले.
यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. सुरज पवार, कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, डॉ. योगेश अनाप व डॉ. पराग वाटवे आदी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्र सर्वात अद्यावत कॅन्सर सेंटरच्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन
|