बातम्या
कोल्हापूरात महारोजगार, महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
By nisha patil - 6/13/2023 4:39:49 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी शासन आपल्या दारी या कोल्हापूर जिल्हास्तरीय कार्यक्रमांतर्गत तपोवन मैदानात आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा व महा आरोग्य शिबिराचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी मिलिंद भिंगारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रदीप शेळके, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर आदी उपस्थित होते.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठ व्यवस्था, उपस्थित नागरिक, लाभार्थी, पत्रकार, मान्यवरांची बैठक व्यवस्था तसेच विविध कक्षांची पाहणी करुन कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात 1800 हून अधिक रिक्त पदांसाठी 15 कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
महा आरोग्य शिबिरात रक्तदान शिबिर व नागरिकांसाठी विविध विभागांच्या तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिरात वैद्यकीय तज्ञांसह साधारण 80 आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.
कोल्हापूरात महारोजगार, महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
|