बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनएसएच हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचे उद्घाटन
By nisha patil - 6/1/2025 12:14:23 PM
Share This News:
येथील भांगडिया फाऊंडेशनच्या एनएसएच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.
नागपूर शहरातील गंगाबाई घाट चौक परिसरात भांगडिया फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यास आमदार कृष्णा खोपडे, कृपाल तुमाने, किर्तीकुमार भांगडिया, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, एनएसएच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे अध्यक्ष मितेश भांगडिया, हृदयरोग विशेषज्ञ डॉ. वैभव बियाणी, बालरोग न्यूरोलॉजिस्ट डॉ. उमेश बियाणी, रेडिओलॉजिस्ट डॉ. नेहा बियाणी, स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ.निकिता बियाणी, विनय बियाणी , श्रीकांत भांगडिया आदी उपस्थित होते. हॉस्पिटलच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
एनएसएच हे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय असून याच्या उभारणीमुळे अनेक दुर्धर आजाराच्या रुग्णांना निश्चितच योग्य उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त करून श्री.फडणवीस यांनी एनएसएचचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाची यावेळी पाहणी केली व तेथील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेतली. तसेच या रुग्णालयातील विविध कक्षांनाही त्यांनी भेट दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनएसएच हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचे उद्घाटन
|