बातम्या

संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरजेतील नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन

Inauguration of New Nursing College at Sanjay Bhokare Group of Institutes Miraj


By nisha patil - 1/2/2025 4:08:15 PM
Share This News:



 संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरजेतील नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन

नवे नर्सिंग कॉलेज गुणवत्तापूर्ण शिक्षण देईल यात शंका नाही : ना.हसन मुश्रीफ

श्री.अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, मिरज येथील नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन ना.हसन मुश्रीफ व उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

ना. हसन मुश्रीफ म्हणाले की, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे नाव आहे. हे नवे नर्सिंग कॉलेज गुणवत्तापूर्ण शिक्षण देईल यात शंका नाही. परिसरातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

याप्रसंगी माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, आ. इद्रिस नायकवडी, संस्थेचे अध्यक्ष मा. संजय भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, डॉ. विनोद परमशेट्टी, बाळासो गोंजाटे तसेच इन्स्टिट्यूटचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरजेतील नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन
Total Views: 44