बातम्या

शहाजी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन

Inauguration of Study Board of English Department in Shahaji College


By nisha patil - 12/9/2023 7:36:35 PM
Share This News:



 कोल्हापूर:  शहाजी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ.रघुनाथ कडाकणे सर यांच्या उपस्थितीत पार पडले. इंग्रजी भाषा ,इंग्रजी साहित्य, इंग्रजी बोलणे, इंग्रजीचे एकूणच जागतिक स्तरावरील महत्त्व अशा अनुषंगाने त्यांनी खूप चांगली अशी मांडणी विद्यार्थ्यांच्या समोर केली. त्यांचे भाषण ऐकत असताना इंग्रजी किती सहजपणे आपण बोलू शकतो याचे प्रत्यंतर वारंवार येत होते. या निमित्ताने  सुंदर अशा भित्तिपत्रिकेचे प्रकाशनही विभाग अंतर्गत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते.
   

कार्यक्रमाचे नियोजन इंग्रजी विभाग प्रमुख  प्राध्यापक डॉ. एन. एस. जाधव व त्यांचे सहकारी  डॉ. . एम.आर. वैराट,  डॉ. आर.जे.  बिरजे, डॉ.एस.जी.मंडी, डॉ.एस.ए.चाळके, सौ.एस.के.  भोसले, डॉ.आर.आर.कुलदीप यांनी केले.  यावेळी IQAC समन्वयक, डॉ. आर. डी. मांडणीकर आणि प्रबंधक मनीष भोसले सुद्धा उपस्थित होते. बीसीए विभागातील शरीफा हलदार या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले तर बीए विभागातील विद्यार्थिनी गौरी काशीद यांनी आभार मानले.  या उपक्रमास संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.


शहाजी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन