बातम्या

गारगोटीत उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण ; आरोग्य विभागात अकरा हजार पदे भरणार

Inauguration of Upazila Hospital in Gargoti


By nisha patil - 12/25/2023 7:09:02 PM
Share This News:



गारगोटीत उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण ; आरोग्य विभागात अकरा हजार पदे भरणार

गारगोटी : राधानगरी मतदार संघात आ. प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाकडे गेलेल्या 14 कलमी मागण्याची पूर्तता लोकसभा निवडणुकीपूर्वी करणार असून, आरोग्य विभागात अकरा हजार पदांची लवकरच भरती करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. तेथेतील उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.. यावेळी खासदार संजय मंडलिक अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर आ. प्रकाश आंबेडकर प्रमुख उपस्थित होते.
 

ना . सावंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतिमान सरकारने महाराष्ट्राच्या व सामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय घेतले असून, त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या असून, त्याचा निकाल पंधरा दिवसात येईल, आरोग्य विभाग हायटेक करण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रत्येक तालुक्याला फिरता दवाखाना सुरू करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली
 

  यावेळी खा. मंडलिक म्हणाले, आरोग्य विभागाचे काम काठ टाकल्यासारखे सुरू आहे. आ, आंबेडकर यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीस कार्पोरेट लूक मिळाला आहे. आशिष वास्तु मुरगुड येथे उभारणार आहे.
 

आ. आंबीटकर यांनी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयासारखी आरोग्य सेवा गारगोटीत मिळावी डायलिसिस युनिट सुरू करावे. कसबा तारळे ,आजरा येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत दाजी ग्रामीण रुग्णालय सुरू करावे अशी मागणी केली.
  ना. तानाजी सावंत यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला. कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टर मिलिंद कदम यांचा शाखा अभियंता राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला, तर ताथाजी पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन केले. प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक दिलीप माने यांनी केले.
 

 यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, तहसीलदार अश्विनी अडसूळ ,जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख , वैद्यकीय अधीक्षक मिलिंद कदम, गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव, गोकुळचे च संचालक नंदकुमार डेंगे ,प्राचार्य अर्जुन आंबीटकर, कल्याण निकम, नाथाजी पाटील, सागर शिंदे ,संग्राम सावंत ,विद्याधर परीट आधीसह तालुक्यातील पदाधिकारी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


गारगोटीत उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण ; आरोग्य विभागात अकरा हजार पदे भरणार