बातम्या
कन्या महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन
By Administrator - 9/21/2023 6:40:02 PM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने वाड्मय मंडळ आणि स्पंदन भित्तिपत्रिकेचे उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजयसिंह यादव महाविद्यालयाचे प्रा डॉ.प्रशांत गायकवाड उपस्थित होते.
यावेळी प्रा.डाॅ.प्रशांत गायकवाड यांनी आपल्या मनोगतात आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा दाखला देत त्यांनी भाषा विषयाचे महत्त्व पटवून दिले. अनेक लहान-मोठी उदाहरणे देत मराठी भाषा, मराठी भाषेतील वाडमयाचे स्थान किती महत्त्वाचे आहे ते समजावून सांगितले. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थिनींनी सकारात्मक दृष्टिकोन जोपासणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्या डॉ.त्रिशला कदम यांनी विद्यार्थिनींना महाविद्यालयीन जीवनातच दिशा मिळणं गरजेचं असते. त्यामुळे अशा व्याख्यानांचे आयोजन महाविद्यालयात केले जाते, त्याचा विद्यार्थिनींना निश्चितच फायदा होतो. या वयात न भरकटता अभ्यासाबरोबरच इतर कौशल्यही विद्यार्थिनीनी आत्मसात करावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी केले तर या कार्यक्रमाचे नियोजन डॉ.प्रियांका कुंभार, डॉ.प्रतिभा पैलवान तसेच मराठी विभागातील सर्व विद्यार्थीनींनी केले. सूत्रसंचालन कु. रोमा डांगरे आणि कु. सन्मती चौगुले यांनी केले तर आभार कु.सानिका भोरे हिने मानले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थीनी ,प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कन्या महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन
|