बातम्या
शहाजी महाविद्यालयात वसुंधरा भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन व सामंजस्य करार
By nisha patil - 12/7/2024 1:09:44 PM
Share This News:
कोल्हापूर: महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण आणि सुसंवाद परराज्यातील विद्यापीठ किंवा महाविद्यालयांशी व्हावा जेणेकरून विद्यार्थ्यांची ज्ञानकक्षा अधिक प्रगब्भ होईल या हेतूने प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि शासकीय कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मार्सेल, गोवा या महाविद्यालयातील भूगोल विभाग यांचे दरम्यान (MoU) सामंजस्य करार करण्यात आला. या (MoU) अंतर्गत श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वसुंधरा भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन डॉ. प्रबीर कुमार रथ, प्रोफेसर शासकीय महाविघालय, खांडोला, मार्सेल गोवा यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ प्रदीप कुमार रथ यांनी वसुंधरा मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीन कलागुणांना व्यक्त करावे. त्यासाठीच MoU च्या माध्यमातून परराज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते व शैक्षणिक प्रगती बरोबरच मानवी मूल्य जोपसाने शक्य होण्यास मदत होते.असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी अशा नवीन नवीन उपक्रमामध्ये सहभाग घेवून ज्ञानपातळी वाढवावी असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅक समन्वयक, डॉ आर डी मांडणीकर सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.ऐश्वर्या हिंगमिरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचे स्वागत भूगोल विभाग प्रमुख डॉ डी एल काशिद-पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा डॉ सौ एन डी काशिद -पाटील यांनी केली.याप्रसंगी प्रबंधक श्री रविंद्र भोसले, अधीक्षक श्री मनिष भोसले डॉ आयक्यूएसी सह समन्वयक डॉ ए बी बलुगडे, डॉ के एम देसाई समाजशास्त्र विभाग प्रमुख, डॉ डी के वळवी मराठी विभाग प्रमुख, डॉ एस व्ही शिखरे इतिहास विभाग प्रमुख, डॉ प्रशांत पाटील संचालक शारिरीक शिक्षण , डॉ एन एस जाधव इंग्रजी विभाग प्रमुख, डॉ पांडुरंग पाटील ग्रंथपाल, प्रा गौरव कटकर, प्रा.प्रतिमा शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा शुभम पाटील यांनी मानले.
या उपक्रमात श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व प्राचार्य डॉ.आर.के .शानेदिवाण यांचे प्रोत्साहन मिळाले.
शहाजी महाविद्यालयात वसुंधरा भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन व सामंजस्य करार
|