बातम्या
कुलगुरू च्या हस्ते वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन...
By nisha patil - 12/14/2023 3:31:58 PM
Share This News:
उद्योग आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यावरणाच्या समस्यांचे निराकरण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.शिवाजी विद्यापीठ आणि - किर्लोस्कर उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ वा वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते..
.डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या शाश्वत धोरणासंदर्भात मांडणी केली. विद्यापीठ राबवित असलेल्या न जलसंधारण, ऊर्जा बचत आणि हरित परिसर या उपक्रमांसह भविष्यातील पर्यावरणपूरक योजना सांगितल्या.महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव म्हणाले, वसुंधरा महोत्सवाने कोल्हापूर परिसरात पर्यावरणविषयक जाणिवांचा प्रसार करण्याची भूमिका बजावली. महोत्सवात सादर होणाऱ्या विविध चित्रकृतींच्या माध्यमातून जगभरातले प्रयोग स्थानिकांपर्यंत पोहोचले. त्यामधून प्रेरणा घेऊन अनेक तरुण पर्यावरण चळवळीत कार्यरत झाले. या महोत्सवाच्या माध्यमातून आजवर कोल्हापूरमध्ये राबविण्यात आलेले पर्यावरणपूरक उपक्रम राज्यात सर्वत्र गौरवले गेले आहेत.यावेळी मंचावर किर्लोस्कर उद्योग समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट सी. जी. रानडे, मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख धीरज जाधव, पर्यावरण शास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव, समन्वयक शरद आजगेकर व डॉ. रसिया पडळकर उपस्थित होते.
कुलगुरू च्या हस्ते वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन...
|