बातम्या

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

Inauguration of a special Chitraratha based on the life


By nisha patil - 1/14/2025 1:00:53 PM
Share This News:



कोल्हापूर,  : छत्रपती ताराबाई यांच्या कार्याची स्फूर्ती घेऊन आत्ताच्या पिढीने पुढे जात राहिले पाहिजे यासाठी त्यांचा इतिहास प्रत्येकाला माहित असणे गरजेचे असून त्यांनी केलेले कार्य लेखणीतून समोर येणे आवश्यक आहे. ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकातून छत्रपती ताराबाई यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल अशी आशा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली. महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे.  या सर्वांचा एक भाग म्हणून महाराणी ताराबाई यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाची बांधणी करण्यात आलेली असून त्याचे भव्य उद्घाटन छ.शाहू महाराज समाधी स्थळ, नर्सरी बाग, कोल्हापूर  येथे  करण्यात आले. महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाची संकल्पना ॲड. आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून चित्ररथाची निर्मिती झाली आहे. उद्घाटन प्रसंगी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, हसन मुश्रीफ, मंत्री वैद्यकीय शिक्षण, खासदार धनंजय महाडिक, इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मान्यवर या सर्वांच्या हस्ते  विशेष चित्ररथाचे  उद्घाटन करण्यात आले.  मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार हे ऑनलाइन उपस्थित होते. हा चित्ररथ कोल्हापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे.


सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन
Total Views: 35