बातम्या

कुंभोजमध्ये राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने २० लाखांच्या रस्ताकामाचे उद्घाटन

Inauguration of road works worth 20 lakhs by Raju Shettys initiative in Kumbhoj


By nisha patil - 11/10/2024 3:22:26 PM
Share This News:




कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे): कुंभोज (तालुका हातकणंगले) येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून २० लाख रुपये निधी मंजूर झालेल्या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. अनिल भोकरे यांच्या घरापासून ते धुळा उंदरे यांच्या घरापर्यंतच्या या रस्त्याचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभोज ग्रामपंचायतच्या सरपंच स्मिता चौगुले होत्या. या वेळी राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अंतर्गत रस्त्यांचे महत्त्व स्पष्ट केले आणि या कामासाठी लागणाऱ्या निधीची हमी दिली.

ग्रामपंचायतच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी आणि युवा नेते सौरभ शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपसरपंच अशोक आरगे, पंचायत समिती सदस्य जयश्री पांडव, भरत भोकरे, विनायक पोद्दार यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कुंभोजमध्ये राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने २० लाखांच्या रस्ताकामाचे उद्घाटन