विशेष बातम्या

खोतवाडीत मंदिर स्लॅब कार्याचा आमदार आवाडेंच्या हस्ते शुभारंभ..

Inauguration of temple slab work in Khotwadi by MLA Awade


By nisha patil - 10/2/2025 1:15:55 PM
Share This News:



खोतवाडीत मंदिर स्लॅब कार्याचा आमदार आवाडेंच्या हस्ते शुभारंभ..

विकासाच्या दृष्टीने मोठा टप्पा : ग्रामस्थ

 खोतवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या स्लॅबच्या कामाचा प्रारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. हे कार्य माजी मंत्री, आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून करण्यात आले आहे.

गावाच्या धार्मिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने हा मोठा टप्पा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.यावेळी  सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला.


खोतवाडीत मंदिर स्लॅब कार्याचा आमदार आवाडेंच्या हस्ते शुभारंभ..
Total Views: 138