बातम्या

अंबप येथे 3 कोटी 3 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न

Inauguration of various development works worth Rs 3 Crore 3 Lakh at Ambap


By nisha patil - 11/10/2024 3:20:38 PM
Share This News:



हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय राजू बाबा आवळे यांच्या निधीतून अंबप येथे विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यामध्ये 1 कोटी 81 लाख रुपयांच्या चिरेबंदी ओढा पुलाचे काम, 12 लाख रुपयांचे मातंग समाज अंतर्गत रस्ता पेव्हिंग ब्लॉक, 12 लाखांच्या महादेव मंदिर परिसरातील सुशोभीकरण, 10 लाख रुपयांचे आंबेडकर नगर अंतर्गत डांबरीकरण आणि इतर अनेक विकासकामांचा समावेश होता. एकूण 3 कोटी 3 लाख रुपयांच्या निधीतून हे कामे पूर्ण करण्यात आली.

या प्रसंगी बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूहाचे अध्यक्ष अँड. राजवर्धन पाटील, माजी सरपंच डॉक्टर बी.के. पाटील यांच्यासह गावातील प्रमुख नेते, समाजातील विविध घटक आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अंबप येथे 3 कोटी 3 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न