बातम्या
कोल्हापूरातील चार प्रभागांमधील कामाचा शुभारंभ कृष्णराज महाडिकांच्या हस्ते
By nisha patil - 10/1/2025 8:42:40 PM
Share This News:
कोल्हापूरातील चार प्रभागांमधील कामाचा शुभारंभ कृष्णराज महाडिकांच्या हस्ते
कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्त सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी खा. धनंजय महाडिकांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत.
या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ भोसलेवाडी कदमवाडी मध्ये योगेश पाटील घर ते मंडलिक घर रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलाय. कैलासगडची स्वारी परिसरात मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम पासून ते पद्मावती चौकापर्यंतच्या ड्रेनेज लाईनचे काम नगरोत्थान महाअभियानांतर्गत २० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभही कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झालाय.
खा. धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहराच्या विकासासाठी कटीबध्द असून शहराला पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात कमी पडणार नाही अशी ग्वाही कृष्णराज महाडिक यांनी दिली. या शुभारंभ वेळी रणजित कांबळे, रविकिरण गवळी, प्रेम रजपुत, मोहन जाधव, मंगलताई निपाणीकर, जय खडके, प्रभूराज भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
कोल्हापूरातील चार प्रभागांमधील कामाचा शुभारंभ कृष्णराज महाडिकांच्या हस्ते
|