बातम्या
प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ खात्यावर वर्ग करण्याचे आश्वासन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By nisha patil - 2/16/2024 11:53:09 PM
Share This News:
प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ खात्यावर वर्ग करण्याचे आश्वासन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर ( प्रतिनिधी) गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग १० तास रोखून धरला होता. यावेळेस कोल्हापूरचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार साखर कारखान्यांना शेतक-यांच्या खात्यावर एक आठवड्यात पैसे जमा करण्यास तातडीने मान्यता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली.
गत हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा कमी दर दिला आहे त्या कारखान्यांना प्रतिटन १०० रूपये व ज्या कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा जादा दर दिला आहे त्यांना प्रतिटन ५० रूपये प्रतिटन देण्याचा तोडगा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य केलेला आहे.याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केले असून शासनाने ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन तातडीने वरीलप्रमाणे साखर कारखान्यांना गत हंगामातील दुसरा हप्ता देण्यासंदर्भातील निर्णयास मान्यता देण्यात यावे.
त्याबरोबरच शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतील व नियमीत कर्जदारांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे प्रलंबित शेतक-यांना केवायसी व अटीची पुर्तता केल्याने तातडीने त्यांचे प्रोत्साहनपर अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि उद्याच राज्याचे मुख्य सचिव यांना सांगून ऊस दर नियंत्रण समितीची बैठक बोलावून त्यास मान्यता देण्याबाबत व प्रोत्साहनपर अनुदान मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देवून खात्यावर वर्ग करणार असल्याचे सांगितले.
प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ खात्यावर वर्ग करण्याचे आश्वासन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
|