बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली
By nisha patil - 9/7/2024 8:16:02 PM
Share This News:
गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 56 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट पाच इंचांवर पोहोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे, तर धोका पातळी 43 फूट आहे. दरम्यान गेल्या 24 तासात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वदूर पाऊस होत असल्याने छोटे आणि लघु प्रकल्प वेगाने भरले आहेत. राधानगरी धरणामध्ये 36 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात 2.97 टीएमसी पाणीसाठा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली
|