बातम्या

नांदेडच्या भाग्यनगरमधील घटना फळविक्रेत्यानं चक्क तरूणाचे छाटले दोन्ही हात

Incident in Nanded's Bhagyanagar Fruit seller cut off both hands of a young man


By nisha patil - 8/18/2023 6:18:14 PM
Share This News:



नांदेडची नुकतीच घडलेली घटना थरकाप उडवणारी आहे. केवळ आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्यानं तरुणाचे दोन्ही हात छाटले. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं हात गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर मोहम्मद तौहीद हा आरोपी फरार आहे. शहरातील डी मार्ट परिसरात ही घटना घडली. आठवडी बाजारात भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे  या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी तो डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात आले आणि लसूण विक्रीसाठी गेला होता. त्याच्याच शेजारी मोहम्मद तोहीद हा तरुण देखील हातगाड्यावर फळ विक्री करत होता. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी करुन त्याला धार लावली. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास तो बाजारात आला. काही क्षणातच त्याने मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले तसेच पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

 घटनेनंतर बाजारात धावपळ उडाली होती. घटनेनंतर जखमीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे महिन्या भरापूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हात छाटल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशा प्रकारे घटना घडल्याने कोयत्याने हाथ छाटणारी गँग सक्रिय झाल्याच दिसून येतं आहे. मागील काही दिवसांत खुनाच्या घटना वाढतांना पाहायला मिळत आहे. छोट्या-छोट्या आणि शुल्लक कारणावरून थेट हत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.


नांदेडच्या भाग्यनगरमधील घटना फळविक्रेत्यानं चक्क तरूणाचे छाटले दोन्ही हात