बातम्या
चक्क 10 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीतील घटना
By nisha patil - 4/7/2023 4:50:55 PM
Share This News:
चक्क 10 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीतील घटना
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वाळूज महानगर परिसरात एका 10 वर्षीय मुलासोबत दोघांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन विकृत तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. अनिकेत दणके आणि इरफान उर्फ गोल्या जफर सय्यद अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. 10 वर्षीय मुलगा कुटुंबासह वाळूज उद्योगनगरीत राहतो. शनिवारी दुपारी तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. बराच वेळ झाला, तरी तो घरी न परतल्याने, त्याच्या आईने मोठ्या मुलाला त्याला शोधून आणण्यासाठी पाठविले. दरम्यान, लहान भावाला नावाने हाका मारून मोठा भाऊ परिसरात त्याचा शोध घेत होता. याचवेळी एका खोलीमधून पीडित मुलाने आपल्या मोठ्या भावाला 'दादा, मला वाचव' अशी आरोळी दिली. त्यामुळे मोठ्या भावाने त्या आवाजावरून अनिकेत दणके याच्या घरात प्रवेश केला असता, अनिकेत हा लहान भावासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचे दिसले. तिथे शेजारी इरफान उर्फ गोल्या जफर सय्यद हाही होता. तर मोठ्या भावाला पाहून अनिकेतने पीडित मुलाला सोडून दिले.
अनिकेत दणके आणि इरफान सय्यद या दोघा विकृतांनी घडलेला प्रकार कुणास सांगू नका, अन्यथा जीवे मारून टाक, अशी धमकी दोन्ही भावंडांना दिली. दरम्यान घरी गेल्यावर या भावांनी आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे पीडित मुलाच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अनिकेत आणि इरफान सय्यद या दोघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पागोटे करत आहेत. रविवारी सायंकाळी पोलीस पथकाने उद्योगनगरीत सापळा रचून इरफान सय्यद यास ताब्यात घेतले असून, अनिकेत फरार आहे.
चक्क 10 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीतील घटना
|